कोळगाव ता-भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे कृ.भ.को.चे दिवंगत संचालक तथा आमडदे ता.भडगाव येथील समाजकारण,राजकारणात आपला ठसा उमटवणारे स्व.आण्णासाहेब अशोक हरी पाटील यांच्या १७ व्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,ज्येष्ठ शिक्षक रामदास कुंभार,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या हस्ते स्व.आण्णासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसर स्वच्छ करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब कोळगावकर यांनी केले तर सुत्रसंचालन एस.ए.वाघ तसेच आभार प्रशांत पाटील यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.