गोवंश हत्या बंदी लागू असतांना सुद्धा हिंगणे परिसरात १० बैल मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ

0
15

बोदवड प्रतिनिधी 

दररोज प्रमाणे चालणारी अवैध गुरे ढोरे वाहतुक चिंतेचा विषय बनलेली आहे. मुक्ताईनगर ते हिंगणे फाटा दरम्यान मृत गुरे-ढोरे सापडण्याचे प्रकार वाढत आहे. हिंगण्या जवळ मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने दि.२१ रोजी नागरिकांनी या मागील प्रकाराचा तपास घेतला.हिंगणे फाटा नजीक असलेल्या महादेव मंदिर परिसराच्या काही अंतरावर १० बैल मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर चेक पोस्ट वरुन अवैध गुरे-ढोरे वाहतुकीचे वाहने दलालांमार्फत पाकिटचोर अधिकाऱ्यांच्या संमतीने सोडली जातात. पुढे मुक्ताईनगर ते हिंगणा फाटा दरम्यान जंगल येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग रात्रीच्या सुमारास सामसूम असतो. अंधार्या रात्रीचा व कोणी नसल्याचा फायदा घेऊन राजस्थान, मध्य प्रदेश येथुन लांब पल्ला गाठत आणुन प्रवासात मृत झालेली जनावरे या जंगलात फेकून दिली जातात. मुक्ताईनगर ते बोदवड यादरम्यान दररोज कत्तलीसाठी १०ते १२ आयशर , ट्रक अवैध पद्धतीने वाहतुक होत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गुरे ढोरे वाहतुक होत असतांना संबंधित पोलीस प्रशासनाने त्याकडे असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय नसुन त्यामागील कारणाचा शोध घेण्याचा विषय बनलेला आहे.

गोवंश हत्या बंदी असतांना १० बैल मृत अवस्थेत आढळल्याने कायद्याचे पालन मुक्ताईनगर व बोदवड पोलिस प्रशासनाच्या वतीने होत नसल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here