साईमत, तळोदा : प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील गव्हाणीपाडा येथील येथील जि. प. शाळेत सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
तळोदा तालुक्यातील गव्हाणीपाडा येथील येथील जि. प. शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना लोभाणी गृप ग्रामपंचायतचे सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील गरीब वंचित आदिवासी समुदायातील विध्यार्थी शैक्षणिक साहित्य पासुन वंचित राहू नये व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालु असाव्ो आणि पटसंख्या टिकून राहावी या उद्देशाने ग्रूप ग्रामपंचायत लोभाणी ग्रामपंचायतचे सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून गव्हाणीपाडा येथील जि. प. शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वही-पेन, चित्रकला वही, पेन्सिल, रंग पेन्सिल,उजळणी पुस्तक, आदी साहित्य व बिस्किट वाटप करण्यात आले.
याव्ोळी लोभाणी ग्रामपंचायत सरपंच शानुबाई वळवी, उपसरपंच रमेश पाडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण पाडवी, शाळा समितीचे उपाध्यक्ष कुसबा नाईक, मुख्याध्यापक दिनेश मोरे ,शिक्षक अमोल काळे, शिक्षिका रंजना पाडवी, अंगणवाडी सेविका अंबावती पाडवी, दुर्गा पाडवी, सुनील पाडवी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.