खूशखबर : सप्टेंबरमध्ये सोन्या-चांदीचे दर सर्वात कमी, जाणून घ्या

0
13
खूशखबर : सप्टेंबरमध्ये सोन्या-चांदीचे दर सर्वात कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारतीय आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने चढ-उतार होत असते. मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव वधारले होते. मात्र या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घट होताना दिसत आहे. त्यामुळे या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सोन्या-चांदीचा दर सर्वात कमी आहे. आज (शनिवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दर 45,240 रुपये आहे. तर चांदीची किॆमत (Silver Price) 60,600 रुपये प्रति किलो पोहचली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सलग घसरण झाली आहे. त्यामुळे या महिन्यात ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सलग पाच दिवस सोन्याच्या दरात घट झाली. सध्या सोन्याचा भाव 50 हजारच्या आत आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरात कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. दरम्यान, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here