जळगाव : प्रतिनिधी
विश्वविख्यात अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे साहेब यांचे मध्यप्रदेश मधील रावेरखेडी येथे भव्य स्मारक (समाधी) तसेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे भव्य पुतळा निर्माण करण्याचा निर्णय घेऊन पाठपुरावा करणारे राज्यसभेचे खा. विनय सहस्रबुद्धे यांची ब्रह्मदंड मासिकातर्फे संपादक अजय डोहोळे व अनघा डोहोळे यांनी सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.