खानदेशातील शिवसेनेचा ढाणा वाघ म्हणून ओळख असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पाटील यांनी आज थेट गुवाहटीमध्ये पोहचून एकनाथ शिंदे यांना चरणस्पर्श करून नमस्कार केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना पाटील यांनी उद्या आणखी शिवसेनेचे आमदार गुवाहटीममध्ये पोहचणार असल्याचा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आज सकाळीच गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपण गुवाहटी येथे निघोलो असल्याची घोषणा केली होती. माझ्या रक्तात शिवसेना आहे, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. पक्ष बदलणार नाही, मी गुवाहटीला चाललो आहे. राज्यातील बहुतेक मंत्री नेते गेले. जिल्यातील तीन जणही गेले मी एकटा काय करू? असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले होते.