खान्देशचा परिवर्तन कला महोत्सव कोकणात रंगणार

0
24

जळगाव : प्रतिनिधी: कणकवलीत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान परिवर्तन कला महोत्सव होत आहे. एकाच संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम असलेला खान्देशचा महोत्सव कोकणात पहिल्यांदा होतो आहे.
काही वर्षांपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. कोरोनामुळे मागील वर्षी आठ महोत्सव रद्द होते. राज्यभरातील महोत्सवाची सुरुवात कणकवली येथून होत आहेत. महोत्सवाची सुरुवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित अरे संसार संसार या कार्यक्रमाने 25 फेब्रुवारी रोजी होईल. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन, दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. 26 रोजी श्रीकांत देशमुख लिखित व शंभू पाटील नाट्यरूपांतरित योगेश पाटील दिग्दर्शित नली` एकलनाट्य, 27 फेब्रुवारी रोजी शंभू पाटील लिखित व मंजूषा भिडे दिग्दर्शित अमृता साहिर इमरोज हे नाटक सादर होणार आहे. हा महोत्सव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात होणार आहे. महोत्सवाला कांताबाई व भवरलाल जैन ट्रस्ट चे सहकार्य लाभले आहे. अरे संसार संसारचे 2 प्रयोग, नलीचे 51 व ‘अमृता साहीर इमरोज`चे 5 प्रयोग झाले आहेत. महोत्सवासाठी आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, शरद सावंत हे मेहनत घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here