साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 9 ऑगस्ट रोजी ‘माझी मातृभूमी माझा देश’ यावर आधारित ‘पंच-प्रण’ प्रतिज्ञा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने ‘माझी मातृभूमी माझा देश’ यावर आधारित ‘पंच-प्रणाची’ शपथ घेतली. या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्यासाठी आपण सर्वांनी ‘पंच-प्रण’ आत्मसात करून भारत देशाला विकसित देश करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य राजेंद्र चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे, ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा.सरोदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ताहिरा मीर, विद्यार्थी विकास महिला अधिकारी डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय डांगे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.