सावदा : प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडसे या निवडणुकीत नक्कीच बाजी मारतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही खडसे विधान परिषदेत निवडून येतील असे वाटते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांचे अनेक समर्थक गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत, असे राजेश वानखेडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने खडसे यांना उमेदवारी दिल्याने खानदेशात आणि विशेषत: तापी खोऱ्यात त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खडसे यांचा संभाव्य विजय साजरा करण्यासाठी मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, रावेर, सावदा या तापी परिसरातून त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांचे बुकींग देखील केले. आहे. तसेच रविवारी त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.
यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, निवृत्ती पाटील, योगेश कोलते, सुनील नेवे भुसावळ, संदीप देशमुख, संजय चव्हाण, रमेश पाटील, सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे (सावदा), अतुल पाटील (यावल), राजेश पाटील (जळगाव), पंकज येवले, सय्यद अजगर, शेख कुर्बान, कैलास चौधरी (बोदवड), हेमराज चौधरी (फैजपूर), गोंडू महाजन (रावेर) आदींचा समावेश आहे.