कोळी समाजाच्या विभागीय अध्यक्षपदी भिकन नन्नवरे

0
19

जळगाव : प्रतिनिधी
अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि.) शाखा महाराष्ट्र प्रदेशच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी भिकन शामराव नन्नवरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र त्याना देण्यात आले आहे.

धरणगाव तालुकयातील बांभोरी(प्र.चां) येथील सामाजिक कार्यकर्ते भिकन शामराव नन्नवरे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परेश कांति कोळी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल देविदास नन्नवरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

भिकन नन्नवरे हे अखिल भारतीय कोळी समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांनी अनेक सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची खांदेश विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दिनांक १० मे रोजी त्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्यसचिव अनिल देविदास नंन्नवरे, जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष धनराज विठ्ठल साळूंखे, धरणगाव युवा तालुकाध्यक्ष अजय नंन्नवरे, शाखा अध्यक्ष रविंद्र सदाशिव नंन्नवरे, महेंद्र नंन्नवरे,कृष्णा नंन्नवरे,आंबादास नंन्नवरे,समाधान नंन्नवरे,बंटी नंन्नवरे,धिरज नंन्नवरे,गणेश नंन्नवरे,सागर सोनवणे,रोहीत सोनवणे,विकास नंन्नवरे,राहूल सोनवणे,योगेश कोळी,समाधान सपकाळे आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here