Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»कोरोना संबंधित शासनाचे नियम पाळून कुंभमेळा यशस्वी – जर्नादन महाराज
    फैजपूर

    कोरोना संबंधित शासनाचे नियम पाळून कुंभमेळा यशस्वी – जर्नादन महाराज

    saimat teamBy saimat teamApril 30, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर : प्रतिनिधी
    यावर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन हरिद्वार येथील कुंभमेळा शासन नियमाचे पालन करून यशस्वीपणे पार पडल्याचे सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. नुकतेच त्यांचे फैजपूर येथे आगमन झाले. फैजपूर येथील सतपंथ मंदिरात त्यांच्या मातोश्री यांनी औक्षण करून स्वागत केले. तत्पूर्वी भुसावळ येथे रेल्वे स्टेशनवर आ.संजय सावकारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, फैजपूर येथे आगमन होताच त्यांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्यासह गेलेल्या सहकार्‍यांची कोरोना चाचणी केली. ती चाचणी निगेटिव आली आहे.
    महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, हरिद्वार येथील स्वामी जगन्नाथ धाम येथे आयोजित विविध कार्यक्रमात कुंभ काळातील शाही स्नानाचा लाभ, भारतभरातून आलेल्या सर्व संत महात्म्यांचे दर्शन व आशिर्वाद मिळाला. सात दिवसात संगीतमय सुमधुर गोपीगीत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचे प्रक्षेपण दिशा टीव्ही चॅनलवर प्रसारीत करून जगभरातील असंख्य भक्तांनी याचा लाभ घेतला. या संपूर्ण कार्यक्रमात प्रेरणापिठ पिराणाचे जगदगुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्‍वर दास महाराज, श्री जगन्नाथ धामचे महंत अरुणदास महाराज, श्री निर्मल पंचायती आखाड्याचे महंत ज्ञानदेव सिंह महाराज, महामंडलेश्‍वर हरि चैतनानंदजी महाराज, पूज्य गीता मनिशी ज्ञानानंद महाराज, साधवी कृष्ण कांताजी महाराज, महामंडलेश्‍वर जयरामदास महाराज, कुसुंबा (ता.रावेर) येथील श्री राम मंदीर ट्रस्टचे महंत भरत दास महाराज, फैजपूर येथील खंडेराव देवस्थानचे गादिपती महामंडलेश्‍वर पुरुषोत्तम दास महाराज, सतपंत संस्थांचे प्रमुख देवजी पटेल, महामंत्री पवनजी नारंग, मुखी महाराज अशोक नारखेडे आदी संत महात्म्य यांनी उपस्थिती दिली.
    या कार्यक्रमादरम्यान श्री निर्मल आखाडा येथे सनातन वैदिक सतपंत संप्रदायाचे संत जयराम हरीजी महाराज व दिव्यानंद जी महाराज यांचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न होऊन त्यांना ‘महामंडलेश्‍वर’ ही उपाधी प्रदान केली. परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी नित्यनियमाने त्यांचे प्रेरणास्थान, जगद्गुरू, साकेतवासी स्वामी रामानंदाचार्य हंसदेवाचार्य यांचे स्मरण करून आपल्या दिनचर्येला सुरुवात केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Faizpur : कुसुमताई विद्यालयात गीता जयंती निमित्त भाषण स्पर्धा

    December 10, 2025

    Chain : यावल येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

    December 8, 2025

    Hilly : डोंगराळे गुन्ह्यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.