साईमत साकेगाव ता. भुसावळ वार्ताहर
जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी भुसावळ तालुक्यातील साकेगाव सजाचे कोतवाल जितेश चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेची महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. याबैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रतिनिधी तसेच कोतवाल कर्मचारी उपस्थित होते. जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पदावर भुसावळ तालुक्यातील साकेगाव सजाचे कोतवाल जितेश चौधरी यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रवीण चिखलकर, तालुका प्रतिनिधी अशोक पाटील, धनंजय महाजन, चंद्रकांत सरदार, सुनील खराटे, सुपडू कोळी, ईश्वर ठाकूर, शरद पवार आदिंची उपस्थिती होती.