केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे 1 जूनला एनजीओ कार्यशाळेचे आयोजन

0
78

जळगाव ः प्रतिनिधी
केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे एनजीओ क्लिनिक उपक्रमांतर्गत ग्रामविकासाच्या रोजगार संधी व प्रकल्प-प्रस्ताव लेखन कार्यशाळा 1 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. संभाजी राजे नाट्यगृहात सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ही कार्यशाळा होईल.
स्वयंसेवी काम करणाऱ्या संस्थांमधील कार्यकर्त्यांना संस्थेत चालणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी किंवा प्रस्तावित उपक्रमासाठी निधीची आवश्‍यकता असते. त्यासाठी योग्य प्रकारे आपल्या कामाची मांडणी करणे गरजेचे असते. उपयोगी असणारे प्रकल्प, प्रस्ताव लेखनाचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे. सीएसआर व प्रकल्प-प्रस्ताव विषयावरील तज्ज्ञ डॉ. प्रसन्न पाटील यांचे प्रकल्प प्रस्ताव लेखन या विषयावर तर ग्रामविकास व रोजगार या विषयातील सुमारे 20 वर्षांचा अनुभव असलेले डॉ. प्रसाद देवधर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे ही कार्यशाळा खूपच उपयुक्त ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here