केंद्र सरकारने आज अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही घोषणा जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गंत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. तसंच, तरुणांना रोजगारही दिला जाणार आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलाचे प्रमुखांसह या योजनेचा आज घोषणा केली आहे. भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत एक निर्णय घेतला आहे. आज अग्नपथाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक योजनेची घोषणा आम्ही करत आहोत. अग्निपथ योजनेअंतर्गंत अग्निवीर सेनामध्ये सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ही योजना देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी व देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने सुरू करण्यात येत आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
अग्निवीर जवानांसाठी ऑफर
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ योजनेमुळं तरुणांचे आरोग्य आणि फिटनेस सुधारेल. तसंच, विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे एकूण जीडीपी च्या वाढीस मदत होईल. एक उत्तम पॅकेज, सेवा निधी पॅकेज, अपंगत्व पॅकेजही जाहीर केले आहे.