केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

0
14

नवी दिल्ली : वृत्तसंस्था I भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

देशात आणि राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राजकीय नेते आणि मंत्री यांनाही कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्रात 12 आणि 40 पेक्षाजास्त आमदार आणि राजकीय नेत्यांना कोरोना झाला आहे.काही दिवासांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा यांच्यानंतर आता गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच याआधी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here