जळगाव : प्रतिनिधी
भाजपाचे केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा व व्यवसाया बद्दल अपमान केला आहे. त्याप्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हाशाखे तर्फे निषेध करत राजीनाम्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
भाजपाचे केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा व व्यवसाया बद्दल अपमान केला आहे. त्यांचा वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखे तर्फे उप जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देऊन ना. रावसाहेब दानवे यांचा राजीनामा किंवा माफीनामा घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे , महिला जिल्हाध्यक्ष संगीता गवळी जिल्हा सहकार्याध्यक्ष किशोर वाघ, नाभिक समाज विकास मंडळ अध्यक्ष जगदीश वाघ, नाभिक समाज विकास मंडळ शहराध्यक्ष भिकन बोरसे , नाभिक हितवर्धक संस्था शहर अध्यक्ष अरुण वसाने, कार्याध्यक्ष जगदीश निकम, पिंप्राळा नाभिक युवा सेना अध्यक्ष भैय्या वाघ, रामभाऊ जगताप, नाना बोरसे. संजय सोनवणे, बापूसाहेब जगताप, उदय पवार, संजय सनांसे, गोपाल निकम, गणेश बोरनारे, हिमांशु गवळी, बंटी ठाकरे, दर्शन चौधरी, संदीप वसाने आदि पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा पदाधिकारी तसेच शहरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
