धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शेरी येथील रहिवासी तथा धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भीमराव जाधव यांनी शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील , शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्या उपस्थिती शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भीमराव जाधव यांचा भगवी शाल व श्रीफळ देऊन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.