अमळनेर ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रमुख व जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांची बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वानमुते बिनविरोध निवड झाल्याबद्दल ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी शाल व बुके देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अमळनेर बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासनमध्ये मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या ६० वर्षात प्रथम एका महिलेला सभापतिपदाचा कारभार पाहता येणार आहे. अमळनेर येथील बाजार समितीच्या तालुक्यातील नऊ जणांची प्रशासकीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात राज्य शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग मंडळाने मंजुरी दिली असून त्यांच्या निवडीचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले आहेत. नऊ जणांमध्ये पाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व दोन सेना व कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांचा समावेश आहे.
सत्काराला उत्तर देताना तिलोत्तमा पाटील म्हणाल्या की, ओबीसी परिषदेच्या माध्यमातून माझा सत्कार झाल्याबद्दल मी सदैव ओबीसी परिषदेचा ऋणी राहील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माझी निवड झाल्यामुळे शेतकरी बांधवांसाठी विधायक उपक्रम राबवण्यात मी कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले.