कुटुंबाबरोबर सामाजिक बांधिलकी जपा ः दादा महाराज जोशी

0
14

जळगाव ः प्रतिनिधी
आधुनिक विचारसरणीमुळे एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत असून विभक्तीकरण वाढले आहे. त्यामुळे व्यक्ती समाजापासून दूर जात आहे. यासाठी आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या समाजात राहून सामाजिक बांधिलकीही जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चिमुकले राम मंदिराचे विश्‍वस्त दादा महाराज जोशी यांनी केले.

चितोडे वाणी समाज कार्यकारिणीतर्फे मायादेवीनगरातील रोटरी हॉलमध्ये विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठांच्या सन्मान सोहळा झाला. अध्यक्षस्थानी समाज अध्यक्ष प्रा. डॉ. उमेश वाणी हे होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्य केलेल्या 50 विद्यार्थ्यांचा गुणगौरवसह वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या 40 ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.

विश्‍वस्त दादा महाराज जोशी पुढे म्हणाले की, समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे.आपले कुटुंब एकत्रित ठेवण्याबरोबरच आई-वडिलांचा सन्मान करीत समाजाचे संस्कार कायम ठेवण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. उमेश वाणी यांनी समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून विविध उपक्रमातील सहभाग वाढवण्याचे आवाहनही केले.

यावेळी पहिली ते पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सुयोग यावलकर, संजय यावलकर, ॲड. मंजू वाणी, श्रीकांत वाणी, विनायक अट्रावलकर, प्रशांत अकोले, वंदना गडे उपस्थित होते. शुभदा वाणी हिने सूत्रसंचालन केले. सचिव शेखर अकोले यांनी आभार मानले. शुभांगी यावलकर, अर्चना अट्रावलकर, नितीन अट्रावलकर, प्रकाश पाटील, अनघा खारूळ, अनिल अकोले, अनिल गडे, अरुण वाणी, किशोर वाणी, निशिकांत बामणोदकर यांनी नियोजन केले.

सरप्राईस गिफ्टची धमाल
कार्यक्रमास आलेल्या समाजबांधवांना उत्कृष्ट ड्रेसेस, संवाद यासह विविध गेमद्वारे सरप्राइज गिफ्ट देण्यात आले. बक्षिसांचा वर्षाव होत असल्याने समाजबांधव कमालीचे सुखावले. उपाध्यक्ष विनोद अजनाडकर यांनी विविध गमतीदार गेमच्या माध्यमातून विजेत्यांना बक्षिसाचे वितरण केले.राजेश यावलकर यांनी संस्थेच्या समाजासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. म्युकर मायक्रोसीस व कोरोनाच्या संसर्गावर मात केलेल्या समाजबांधवांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here