किरकोळ पावसात अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांची निष्क्रियता उघड.

0
17

यावल (सुरेश पाटील)

दि. 7 मार्च 2022 रोजी रात्री पासून किरकोळ पाऊस सुरू झाला या पावसात यावल शहरातील तिरुपती नगर,फालकनगर, एस.टी.स्टँड परिसर व इतर काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर यावल चोपडा रोडवर वढोदे गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर साकळी जवळ आज दि.8 रोजी सकाळी नदीवरील पुलावर पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने वाहतूकदारांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.किरकोळ पावसामुळे वीजपुरवठा खंडित आणि पावसाचे पाणी पुलावर साचुन असल्यामुळे तसेच कामांमध्ये टक्केवारीचे प्रमाण वाढल्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची निष्क्रियता उघड झाली आहे.अधिकारी कर्मचारी व ठेकेदार लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्यांचे नियत्रण राहिले नसल्याचा आरोप सुद्धा नागरिकामधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here