यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव हे बऱ्हाणपूर–अंकलेश्वर या महामार्गावरील मुख्य बाजार पेठेचे गाव आहे,आणि राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे किनगाव नायगांव लोकांची मोठ्याप्रमाणात रहदारी व वाहतूक प्रमाणात होत असते. किनगाव नायगाव रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडलेला आहे या पडलेल्या खड्ड्यांमुळे किनगाव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद विभाग संबंधित कर्मचाऱ्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने किनगाव,नायगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच हा पडलेला खड्डा संबंधितांनी तात्काळ दुरुस्त न केल्यास हिंदवी स्वराज्य सेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
किनगाव नायगांव मुख्य रस्त्यावर किनगाव मधील तडवी वाड्यात एका गटारी वरचा धाप्याचा भाग खुप दिवसापासून तुटलेला आहे त्याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे परंतु याकडे संबंधित प्रशासन व अधिकारी कर्मचारी यांचे लक्ष नाही हे रहदारी करणाऱ्यासह रहिवासी नागरिकांचे मोठे दुर्भाग्य आहे . तेथे छोटेमोठे अपघात झालेले आहेत.अधिकारी तिथे कुणाचा तरी मोठा अपघात होण्याची तर वाट पाहत नाही ना!असा तेथील रहिवाशी लोकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पडलेला खड्डा दुरुस्त करावा अशी हिंदवी स्वराज्य सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे, आणि खड्डा तात्काळ दुरुस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे अपेक्षा आहे.