यावल ( सुरेश पाटील)
तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायतीत 6 लाख 99 हजार 374 रुपयाचा अपहार केल्याची तक्रार संबंधित अधिकार्यांकडे किनगाव येथील रामचंद्र दाजीबा पाटील यांनी केली होती परंतु तक्रारीची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी न घेता चौकशी व कार्यवाही न केल्याने यावल न्यायालयात तक्रार दिल्याने यावल न्यायालयातर्फे यावल तहसीलदार,बिडिओ,पोलीस,ग्रामसेवक,सरपंच यांची चौकशी होणार आहे.याबाबत यावल न्यायालयाने दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी चौकशीचे आदेश दिल्याने यावल तालुक्यातील महसूल,पोलीस, पंचायत समिती कार्यक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायत मध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत तीन कामे केल्याचे दर्शवून नी विधीप्रमाणे कामे न करता अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करून सर्व कामाची एकूण सहा लाख 99 हजार 374 रुपये रकमेची कामे दर्शवून अपहार केला आहे याबाबत किनगाव बुद्रुक येथील रामचंद्र दाजीबा पाटील यांनी यावल पोलीस स्टेशनला दिनांक 21 8 2020 रोजी यावल पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असता चौकशी करणार यावल येथील पोलीस यांनी चौकशी केली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की किनगाव येथील रामचंद्र दाजीबा पाटील यांनी यावल न्यायालयात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,तत्कालीन यावल तहसीलदार जितेन्द्र कुंवर, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश शांताराम पाटील,यावल पोलीस स्टेशन मधील तपास करणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील सोपान तायडे,किनगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रदीप रतन धनगर,किनगाव सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी,यावल पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आर.पी.इंगळे यांच्याकडे तक्रारी असताना त्यांनी चौकशी केली नाही.
किनगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांनी खोटे कम्प्लिशन सर्टिफिकेट/काम पूर्णत्वाचा दाखला घेऊन ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत 3 कामे केली असे दर्शवून निविदे प्रमाणे कामे न करता अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करून सर्व कामाची एकूण सहा लाख 99 हजार 374 रुपये रकमेची कामे दर्शवून अपहार केला आहे. म्हणून तसेच वरील संबंधित संबंधित अधिकारी यांनी चौकशी करून कार्यवाही न केल्यामुळे यावल न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर आता यावल न्यायालयातर्फे दि.17/2/2022 पासून चौकशी चौकशी सुरू झाली आहे.तक्रार अर्जाचे चौकशीकामी फिर्यादी तर्फे फैजपूर येथील एडवोकेट नितीन भावसार काम बघत आहेत.
न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याने यावल महसूल,पोलीस, पंचायत समिती कार्यक्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अधिकाऱ्यांनी तक्रार अर्जाची दखल न घेतल्यामुळे यावल न्यायालयातर्फे होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.