कारागृह विभागातील १७ अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर

0
18

साईमत, पुणे ः प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘माझी माती माझा देश- मातीला नमन, वीरांना वंदन’ या उपक्रमांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र कारागृह विभागातील एकूण १७ अधिकारी व कर्मचारी यांना पदके जाहीर झाली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदके महाराष्ट्र कारागृह विभागास जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये ५ अधिकारी कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक तसेच १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित करण्यात आले आहे.
पदक प्राप्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अपर पोलीस महासंचालक श्री. गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित झालेले अधिकारी, कर्मचारी –
सुनील निवृत्ती ढमाळ, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर व प्रकाश बाबुराव उकरंडे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-१), आनंद शंकर हिरवे, सुभेदार, गणेश पांडुरंग घोडके, हवालदार.

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित झालेले अधिकारी, कर्मचारी-
अनिल हणमंत खामकर, अधीक्षक येरवडा खुले कारागृह, वामन तुकाराम निमजे व विजय ज्ञानेश्वर कांबळे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-१), तानाजी कृष्णा धोत्रे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-२), किशोरीलाल सुकराम रहांगडाले, विजय लाडकू पाटील, प्रकाश महादेव सातपुते व चंद्रकांत नारायण बोसोडे, सुभेदार, बाबासाहेब हनुमंत चोरगे व दत्तात्रय किसन भोसले, अशोक कुंडलिक आडाळे व सुधाकर रामकृष्ण माळवे, कारागृह शिपाई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here