विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे मंगळवार मध्यररात्रीच्या सुमारास शेतातील गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे, जरंडी येथील शेतकरी नितीन मानसिंग पाटील यांच्या जरंडी शिवारातील गट नंबर ३८०/ब यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरीला गेला आहे, चोरांनी शेतातील गोडाऊन जवळ नसल्याच्या फायदा घेत नितीन पाटील यांच्या शेतातील गोडाऊनच्या शेडचे कुलूप तोडून अंदाजे ४० क्विटल ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा कापूस चोरी केला आहे
या घटनेची पोलिसांना माहीत दिल्यानंतर घटनास्थळी सोयगाव पोलीस दाखल झाले पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित , जमादार रवींद्र तायडे, राजू बर्डे हे करीत आहेत.