काथार वाणी समाजबांधवांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

0
31

जळगाव ः प्रतिनिधी
काथार कंठहार वाणी समाज सेवा संघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात त्रैवार्षिक हिशेब, ताळेबंद वाचन व घटना दुरुस्ती करणे यावर चर्चा झाली.त्यानंतर जीवन गौरव पुरस्काराचेे वितरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी विजय वाणी हे होते.

यावेळी म्हाडाचे सभापती संजय केणेकर हे उपस्थित होते. सभेत अनंत वाणी यांना जीवन गौरव, वसंत बाविस्कर, विजय वाणी, सुधाकर वाणी, मुकुंद वाणी, नंदकुमार नांदेडकर, डी. एल. वाणी, मोहनदास वाणी, नारायण वाणी, नंदकिशोर कामळस्कर यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच संजय केणेकर, राजेंद्र फुलंब्रीकर, डॉ. विजय बाविस्कर, दीपाली वाणी, वासुदेव वाणी, अजय कामळस्कर, रेखा वाणी यांनाही सन्मान पत्र देण्यात आले. अनिल वाणी यांनी सूत्रसंचालन केले. संतोष वाणी यांनी आभार मानले. नंंदकुमार नांदेडकर, भूषण हरणे, श्रीकृष्ण पद्माकर यांनी नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here