जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव बुद्रुक तालुका जामनेर येथील पदवीधर प्रभारी मुख्याध्यापिका शारदा अंबादास शिंपी यांना यजमान विजय बोरसे यांच्या जोडीने राष्ट्रवादी क्राँग्रेस शिक्षक संघातर्फे जिल्हास्तरीय बहिणाबाई चौधरी गुणवंत शिक्षिका पुरस्कार सन 2022 ने राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव
शहराध्यक्षा मंगला पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक,
शाल देऊन जळगाव येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, महानगराध्यक्ष
अशोक लाडवंजारी, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील,संजय गरुड, मगन पाटील आदिंच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
“ एकच ध्यास, गुणवत्ता विकास “ हे ब्रीद घेऊन समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शारदा शिंपी यांनी 30 वर्षे 6 महिन्याच्या कार्य काळात कर्तव्यदक्षतेने शासकीय योजना पारदर्शीपणे राबवत विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेचा सर्वतोपरी आलेख उंचावला. स्पर्धा परीक्षांचे वर्ग ,गतीमंद विद्यार्थ्यांसाठी मागदर्शनपर जादा वर्ग,परिपाठात साने गुरुजी लिखित श्यामची आई कादंबरी तसेच दारुबंदीच्या कथांचे विद्यार्थ्यांकडून अभिवाचन, रांगोळी, चित्रकला व क्रिडा स्पर्धांचे आयोजन करतात. सुदृढ आरोग्यसंपन्नतेसाठी इयत्ता 5 ते 7 च्या विद्यार्थीनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन व सकस चौफेर आहार व यथोचित व्यायाम यावर सदैव मार्गदर्शन करतात . मूल्यसंस्कार , निरोगी मन आणि संस्कार संपन्नतेसाठी हॅपी थॉटस् संस्थेच्या माध्यमातून विजय बोरसे यांच्या मार्गदर्शनाने ताणतणावमुक्त आनंदीमय जीवन जगण्यासाठी प्रेरक उपक्रम सातत्याने राबवितात.
महिला दिनानिमित्त माता पालकांसाठी स्त्रियांच्या आरोग्या संदर्भात विशेष मार्गदर्शनपर सभा तसेच पुरुष पालकांसाठी तंबाखुमुक्ती व तत्सम व्यसनमुक्तीसाठी उद्बोधनवर्ग आयोजित करतात. शाळा व्यवस्थापन समिती, सहकारी वृंद यांच्या सहकार्याने शैक्षणिक उठावांतर्गत शिंपी मॅडम यांनी भौतिक सुविधांनी शाळेचा कायापालट केला आहे.
या उल्लेखनीय शैक्षणिक सामाजिक कामांमुळे शारदा शिंपी यांना यापूर्वी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संस्थेचा जिल्हास्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाज शिक्षिका पुरस्कार 2021 प्राप्त झाला आहे. बहिणाबाई पुरस्कार प्राप्त झाल्याप्रित्यर्थ मुख्याध्यापिका शारदा शिंपी यांचे जामनेर गटविकास अधिकारी अतुल पाटील,पं.स.गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे,केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, पिंपळगांव बुद्रुकचे माजी सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ज्ञानेश्वर पाटील, शाळेचे समस्त सहकारी, पहुर गृप एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख,संस्थेचे सचिव डॉ.अनिकेत लेले,संचालक मंडळ, आर.टी.लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी.पाटील, पर्यवेक्षक एस.व्हि.पाटील विद्यार्थीप्रिय उपक्रमशील माध्यमिक शिक्षक व्हि.व्हि.बोरसे , शिक्षकवृंद, पिंपळगाव बुद्रुक जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नुरखाँ तडवी, निवृत्त शिक्षक पंढरीनाथ शिंपी, .विमल शिंपी, सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.राजेंद्र कापडे, मिनाताई कापडे, चंद्रभागा सोनवणे, उपप्रमुख स्थापत्य अभियंता भानुदास सोनवणे, मनिषा सोनवणे, मुख्याध्यापिका भारती शिंपी, निवृत्त माध्यमिक शिक्षक सुभाष पवार, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, सुनिल सोनवणे,पत्रकार किशोर शिंपी, दिपिका पवार,विक्रांत सोनवणे, प्रविण शिंपी, विशाल पवार मान्यवर आणि आप्तेष्टांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.