जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कला पथकांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनातून आपल्या जिल्ह्यातील कलावंतांना कामे मिळावी यासाठी निवेदन दिले.
14 ऑक्टोबर च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यात दहा संस्थांची कलापथकांची निवड करण्यात आली पण अद्याप पर्यंत कार्यक्रम मिळाले नाही covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून कलावंतांचे कामच बंद आहे त्यामुळे काही कला पथकांच्या कलाकारांवर उपासमारी व मोलमजुरी करण्याची वेळ आलेली आहे.
जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरीत कार्यक्रम देऊ असे कलावंतांना आश्वासनही दिले आहे आज जे कलावंत आपल्या उदरनिर्वाहासाठी कलेवर अवलंबून आहेत असे कलाकारांबद्दल मला सहानुभूती आहे असेही जिल्हाधिकारी साहेबांनी मत व्यक्त केले निवेदन देताना समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे विशाल जाधव तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचे भूषण लाडवंजारी संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे दीपक पाटील, बबन जोगी, बापू जोगी, अशोक जोगी( शिवकालीन कला जोपासणारे गोंधळी )स्वप्नरंग बहुउद्देशीय संस्थेचे महेश राठी ,जयंत चव्हाण इत्यादी उपस्थित होते.