जळगाव ः प्रतिनिधी
कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीने 20 सुवर्ण व 2 रजत पदक प्राप्त केले आहेत. भोपाळ येथे यूथ स्पोर्ट्स कराटे असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 12 खेळाडू सहभागी झाले होते.
खेळाडूंना प्रशिक्षक अश्विनी निकम, राजेंद्र जंजाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बेस्ट अकॅडमीच्या द्वितीय पुरस्काराने जळगाव संघाचा गौरव करण्यात आला. विजेत्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गौरव केला. यावेळी पालकही उपस्थित होते.
पदक प्राप्त खेळाडू असे
उर्वशी बोरनारे, नेत्रा अहिरे, हर्षाली विरकर, कौस्तुभ जंजाळे, मयूर पाटील, स्वरूप पाटील, पूर्वेश विधाते, जान्हवी पाटील, वेदांत हिवराळे, अविनाश राठोड, राम जाधव, मयूर पाटील या खेळाडूंनी काता-कुमिते प्रकारात सुवर्ण आणि रजत पदकांची कमाई केली.