प्रतिनिधी : कजगाव
कजगाव येथून जवळच असलेले पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथे मंगळवारी संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान तेजसबाई पुना जाधव वय 80 वर्ष हे त्यांच्या घरात एकटे असताना अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे पुढील तपास डी .वाय .एस. पी. भारत काकडे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे करीत आहे.
