कजगाव : प्रतिनिधी
कजगाव हे भडगाव तालुक्यातील बाजारपेठचे मोठे गाव आहे गावाला 35 ते 40 गावांचा रोजचा संपर्क आहे यामुळे परिसरातील गावातील ग्रामस्थांना दररोज काही ना काही कामासाठी कजगाव येथे यावे लागते. यामुळे परिसरातील नागरीकांच्या सेवेत लवकरच आधार केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
आजूबाजूच्या गावातील लोकांना दळवलन साठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे अशात गावात ग्रामस्थांना नवीन आधार बनविण्यासाठी भडगाव येथे जावे लागते व्यापारी दृष्टीने बाजारपेठ असलेल्या गावांतून लोकांना आधार संबंधित कामे जसे की नवीन आधार कार्ड बनविणे दुरुस्ती करणे लहान मुलांचे आधार कार्ड बनविणे याकरिता भडगाव येथे जावे लागते संपूर्ण दिवस या कामासाठी खर्च करावा लागत असे कजगाव ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी आधार केंद्र गावातच सुरू करण्यास खूप दीवस आगोदरच मंजुरी मिळाली आहे , पण काही तांत्रिक अडचणी जशा की किट उपलब्ध होणे व केंद्र ला लागणारी बँक गॅरंटी या कारणाने केंद्र सुरू होण्यास उशीर झाला आहे असे केंद्र चालकाने आमचे प्रतनिधी शी बोलताना सांगितले तरी येत्या 8 ते 10 दिवसात आधार केंद्र कजगाव व परिसरातील ग्रामस्थांच्या सेवेत सुरू होईल , प्रत्येक शासकीय कामासाठी लागणारे आधार कार्ड आता आपल्या गावातच मिळणार असल्याने ग्रामस्थांची व परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
–—