Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»कजगावात जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला
    Uncategorized

    कजगावात जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला

    SaimatBy SaimatJune 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कजगाव : आमीन पिंजारी

    येथे चोरीचे सत्र सुरूच असून चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येते आता पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडस करून तब्बल आठ लाख रुपये कीमतीचे जनरेटर चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र पहारेकरी ला अचानक जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली व चोरटे तेथून फरार झाले सदरील चोरीच्या घटनेमुळे गावात एकच चर्चेला उधाण आले आहे अलिकडच्या काही दिवसांपासून गावात विविध ठिकाणांना चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे महादेव मंदिर,ऋषीबाबा मंदिर कालिका माता मंदिरावर चोरट्यांनी हात साफ केल्याचे आढळून आले आहे त्यातच कनाशी रस्त्यावरून काही दिवसांपूर्वी बैल जोडी चोरी झाल्याची घटना घडली होती तर त्याच रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील अडीच लाख रुपये किमतीची ताडपत्री चोरीला गेली होती विशेष म्हणजे त्याच कनाशी रस्त्याजवळील कजगाव पारोळा रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामावरील जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला आहे पाहरेकरीला वेळीच जाग आल्याने पोलिसांनी मोठ्या शिताफीने भामट्यांचा पाठलाग केला मात्र भामट्यांनी ट्रक्टर रस्त्यावरच सोडुन पोलिसांच्या तावडीतून पडून जाण्यात यशस्वी झाले दहा दिवसातील ही कनाशी रस्त्यावरील तिसरी घटना असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे

    चोरीच्या ट्रक्टरनेच चोरीचा प्रयत्न
    प्राप्त माहिती नुसार जनरेटर चोरीसाठी वापरलेले ट्रॅक्टर यापूर्वी चोरी झाल्याचे कळत आहे सदरील ट्रॅक्टर हे दिनांक २० मे रोजी चाळीसगाव जवळून चोरीला गेले आहे तश्या पद्धतीची फिर्यात ट्रक्टर मालकाने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिल्याचे कळते मात्र चोरीच्या ट्रक्टरनेच पुन्हा चोरीचा प्रयत्न केल्याने सामान्य नागरिकांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या आहेत चोरीचा प्रयत्न पोलिसांच्या व पाहरेकरीच्यामुळे फसल्याने व पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रक्टरचा पाठलाग केल्याने चोरटे अंधाऱ्याचा फायदा घेऊन पडून जाण्यास यशस्वी ठरले यावेळी पोलीस नाईक नरेंद्र विसपुते हवालदार राजू सोनवणे पोलीस गाडी वाहन चालक संभाजी पाटील ग्रामसुरुक्षा दलाचे योगेश चौधरी प्रवीण महाजन पहारेकरी रावसाहेब महाजन यांनी चोरट्यांना पाठलाग केला होता

    घटनेची माहिती कळताच मी व आमचे सहकारी पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचवून ट्रक्टर चा पाठलाग केला मात्र अंधाऱ्याचा फायदा घेऊन चोरटे ट्रक्टर रस्त्यावर सोडून पडून गेले आहेत तसेच चोरीसाठी वापरलेले ट्रक्टर आम्ही जमा केले आहे
    – नरेंद्र विसपुते पोलीस नाईक कजगाव पोलीस मदत केंद्र

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.