कच्चा बदाम गायक भुबन बड्याकरचा अपघात, रुग्णालयात दाखल

0
19

‘कच्चा बदाम’ गाण्यासाठी प्रसिद्ध झालेला भुबन बड्याकर रस्ता अपघातात  जखमी झाला आहे. सोमवारीच भुबन बड्याकर हे कार चालवायला शिकत होते आणि त्याचवेळी त्याचा अपघात झाला. त्यानंतर भुबनला जवळच्या रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, या अपघातात भुबन बड्याकर हा गंभीर जखमी झाला आहे. भुबनने नुकतीच सेकंड हँड कार खरेदी केली असून ती चालवायला तो शिकत होता. पश्चिम बंगालमधील एका खेडेगावातील भुबन बड्याकर हा शेंगदाणा विक्रेता होता त्याच्या कच्चा बदाम या गाण्यासाठी प्रसिद्धीच्या झोतात आला. या गाण्यावर सेलेब्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सोशल मीडियावर जोरदार रील्स तयार होत आहेत.पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणारा भुबन बड्याकर रातोरात इतका प्रसिद्ध झाला की त्याचे नशीब चमकले. अधिकाधिक ग्राहक त्याच्याकडे यावेत म्हणून भुबन आपल्या गावात शेंगदाणे विकण्यासाठी कच्चा बदाम गात असे. भुबन आपल्या कुटुंबासह गावात राहतो. एक दिवस त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि काही दिवसांतच तो व्हायरल झाला. या गाण्यासाठी एका म्युझिक कंपनीने भुबनला लाखो रुपये दिले आणि त्याचा व्हिडिओही जारी केला. सोशल मीडियात किती ताकद आहे, हे भुवनाकडे बघून सहज लक्षात येते. ‘कच्चा बदाम’ गाणे आल्यापासून भुबनला सध्या अनेक ऑफर्स येत आहेत. अलीकडेच त्याने कोलकात्याच्या एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्येही परफॉर्म केले. यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here