औद्योगिक वसाहतीच्या जलवाहिनीस पुन्हा गळती

0
11

साईमत साकेगाव ता. भुसावळ वार्ताहर

येथून जळगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीस तीन-चार दिवसांपूर्वी साकेगाव येथे मोठी गळती लागली होती ही गळती युद्ध पातळीवर काम करून बंद करण्यात आली होती. मात्र पुन्हा काल रात्री त्याच ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे एमआयडीसीचा पाणीपुरवठा ठप्प झाल आहे.

दरम्यान, या जलवाहिनीवर जळगाव एमआयडीसी सोबत साकेगाव व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाचा पाणीपुरवठाही अवलंबून आहे. याबाबत औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष घालून ही समस्या कायम स्वरूपी निकाली काढावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here