मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर येथून जवळ असलेल्या जनता कॉलेज जवळ जळगाव येथून बुलढाणा कडे जात असलेल्या जळगाव नांदेड बस ला संगितम ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी ने मागून येऊन धडक दिल्याने बस च्या फुटल्या काचा सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर नागरिकांनी गेली एकच गर्दी.
महाराष्ट्र शासनाच्या जळगाव नांदेड बस बुलढाणा कडे जात असताना मागून येऊन ओव्हरटेक करत असलेल्या संगीतम ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी ने जबर धडक दिल्याने एसटी बस च्या मागील काचा फुटल्या आहे तर यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तर विविध कंपनीच्या लक्झरी बसेस नेहमी संध्याकाळच्या वेळेस मलकापूर येथून पुने कडे 20 ते 25 लक्झरी बस अपडाऊन करत असतात तर बुलढाणा रोड वरील बस स्टॅन्ड जवळ, जनता कॉलेज, राधे हॉटेल जवळ अशा अनेक ठिकाणी रोडवर थांबतात व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना रस्त्यामध्ये खोळंबा निर्माण करतात यामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी अश्या लक्झरी बसेस वाल्यांना पोलीस प्रशासनाने लगाम लावून योग्य ती कारवाई करावी असेही सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.