ओझर प्रतिनिधी
नुपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ओझर मुस्लिम समाज कडून करण्यात आली आहे. त्यासाठी ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्याकडे निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे दि.२८/५/२०२२ रोजी रिपब्लिक भारत न्युज चैनलवर डिबेट करतांना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपुर शर्मा हिने इस्लाम धर्माचे पैगंबर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बद्दल अपशब्द वापरून संपुर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुःखविल्या आहेत. या प्रकरणी संपुर्ण मुस्लिम समाज संत्पप्त झालेला आहे, तरी सदरहु भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपुर शर्मा हिच्यावर आयपीसी धारा कलम २९५ए व १५३ए अन्वये त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ओझर येथिल मुस्लिम समाजाच्या कडून करण्यात आली आहे.