यावल : प्रतिनीधी
तालुक्यातील गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चिखली बुद्रुक येथील श्री दत्त हायस्कूल मधील उपशिक्षक एन.एस.बडगुजर सर हे 29 वर्षांची प्रदीर्घ यशस्वी सेवा करून आज मंगळवार दि.31 मे 2022 रोजी त्यांच्या पदावरून निवृत्त झाले त्यांना गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी तसेच हायस्कूल मधील मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्नेहपूर्ण निरोप दिला.
एन.एस.बडगुजर सर यांना संस्थेचे माजी प्राचार्य तथा कला वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक पी.एस.पाटील सर व यावल येथील मुलींचे विकास विद्यालयातील राजेंद्रभाऊ अमृत चौधरी,शाळेचे मुख्याध्यापक के.यु.पाटील सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
शाळेत सत्काराला उत्तर देताना त्यांनी संस्थेकडून मिळालेल्या मार्गदर्शन व सहकार्य याबाबत ऋण व्यक्त केले तसेच मी सेवानिवृत्त झालो या ज्ञानदानाच्या सेवेतून सदैव आपल्या सोबत राहील असे आश्वासन देतो आणि आपण मनापासून जपलेले नाते असेच टिकून ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्याचा सेवापूर्ती सोहळा निमित्त शुभेच्छा व सत्काराचा कार्यक्रम बुधवार दि.1जून2022 रोजी सकाळी 11 वाजता यावल येथे तिरुपती नगर महादेव मंदिराजवळ त्यांच्या हितचिंतकांनी व मित्रमंडळीने आयोजित केला आहे.