मुक्ताईनगर : प्रतिनीधी
संत चांगदेव मुक्ताबाई महाशिवरात्री यात्रौत्सव एक वर्षाच्या खंडानंतर आज सकाळी ध्वजपूजन करून यात्रौत्सवास आरंभ करण्यात आला. दरम्यान, संत मुक्ताबाई संस्थान व कोथळी ग्रामपंचायत, मुक्ताईनगर नगरपंचायतीची यात्रौत्सवाची तयारी पुर्णत्वाकडे आली असून पाळणे, खेळणी आदि दुकाने थाटण्यास सुरूवात झाली आहे. उद्या दिंड्या परिसरात दाखल होतील.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली गुरू शिष्य जोडीचे अतुट बंधन असलेली संत चांगदेव – मुक्ताबाई माघवारी महाशिवरात्री यात्रा एक वर्षांच्या खंडानंतर गजबजणार असून यात्रेची सूरूवात संत मुक्ताबाई समाधीस्थळ मुळमंदिरात संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अँड. रविंद्र पाटील व विश्वस्त मंडळाचे हस्ते व भाविक मान्यवरांचे उपस्थितीत शुक्रवारी आज सकाळी 10 वा. ध्जजपूजन करण्यात आले.
संत मुक्ताबाई संस्थानने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होवू नये यासाठी दर्शन बारी नवीन बांधकाम केलेल्या जागेत नियोजन करण्यात आले आहे. परिसरातील साफसफाई कामे अंतिम टप्प्यात आहे. मध्यप्रदेश व राज्यभरातून निघालेल्या दिंड्या तालुक्यात घोडसगाव तरोडा सातोड, रुईखेडा , खामखेडा, निमखेडी, वरणगाव , टहाकळी , हरताळे, गावी मुक्काम करून उद्या शनिवारी मुक्ताईनगरात दाखल होतील. दि.27 रविवार एकादशी व दि 1 मार्च महाशिवरात्री हे मुख्य दिवस असल्याची माहिती संत मुक्ताबाई मंदिराचे व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे यांनी दिली.
येणारे भाविक लक्षात घेता जुने कोथळी परिसरात साफसफाई, दिवाबत्ती, पाणीपुरवठा व्यवस्था , पार्किंग सुविधा आदि कामे करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी सहकार्याने कामे पुर्ण केली खेळणी पाळणे भांडी सह छोटीमोठी दुकाने येण्यास सुरूवात झाली आहे असे सरपंच नारायण दादा चौधरी यांनी सांगितले.
एक वर्षांच्या खंडानंतर भरणारी यंदाचा महाशिवरात्री यात्रौत्सवात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थीत राहील असा अंदाज आहे. 2020 मध्ये यात्रा झाल्यानंतर लागलीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन लागले होते त्यामुळे 2021 मध्ये कोरोनाचे सावट जशास तशा स्थितीमध्ये होते म्हणून यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. यंदा कोरोनाचे सावट ओसरत असल्याने फेब्रुवारी 2022 मध्ये मात्र यात्रा उत्सव जोरात साजरा होणार आहे .
दरम्यान, मुक्ताईनगर शहरामध्ये मुख्य रस्त्यावर मास विक्रीचा व्यवसाय चालत आहे. त्याला भरपूर वेळा मुक्ताईनगर येथील वारकरी संप्रदायाने तहसीलदार, पोलीस प्रशासन यांना दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय लावण्या बाबत निवेदन दिले आहे. परंतु अद्यापही ते बंद झाले नाही. सदर मुक्ताई मंदिराकडे जाण्याचा हा प्राचीन मार्ग असल्याने महाशिवरात्री च्या पर्वावर तरी या मास विक्रेत्यांनी रस्त्या समोरील दुकाने थाटू नये अशी अपेक्षा वारकऱ्यानकडून केली जात आहे. जेणेकरून वारकरी संप्रदायातील लोकांचे लक्ष्याचे दुर्लक्ष होणार नाही व धार्मीक भावना दुखावल्या जाणार नाही. यासाठी प्रशासनाने या व्यवसायीकांची दुसरीकडे तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी अशी अपेक्षा वारकरी संप्रदायातील मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक उद्धव जुनारे, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम वंजारी , विशाल सापधरे यांनी दै साईमत प्रतिनिधी शी बोलताना केली आहे.