एकाची दुचाकी लांबविली ; पोलीसात गुन्हा दाखल

0
33

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील काव्य रत्नावली चौकातुन अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील विठ्ठल पेठेतील रहिवासी सुनिल गोपाल वर्मा (वय-४७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोनारकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनिल वर्मा हे दुचाकी (एमएच १९ एव्ही ५६१९) ने काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोर आले. त्याठिकाणी दुचाकी पार्क करून ते उद्यानात गेले. रात्री ८ वाजता परत असल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू मिळून आली नाही. अखेर तीन दिवसांनतर मंगळवारी १४ जून रोजी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रविण जगदाळे करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here