जळगाव : प्रतिनिधी
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आंतरजिल्हा स्क्वॅश स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलातील स्क्वॅश कोर्टवर आज सकाळपासून सुरु झाली. ही स्पर्धा खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने 8 ते 11 मे दरम्यान होत आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 ते 25 जिल्ह्यांचा सहभाग अपेक्षित असून प्रत्येक जिल्हा आणि वयोगटातून 20 ते 25 खेळाडू सहभागी होत आहेत.स्पर्धेसाठी 12 पंच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.खेळाडूंची निवास व्यवस्था केली आहे.जिल्ह्यात या स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्या तरी महाराष्ट्रातून 600 खेळाडू सहभागी होत आहेत. अशा होतील स्पर्धा‘अ’ गट : सब ज्युनियर 11/13/15/17 वर्षांआतील मुले व मुली. या स्पर्धा 8 व 9 मे रोजी होतील. ‘ब’ गट : ज्युनियर व सिनियर गटात 19 वर्षांआतील मुले-मुली व खुला गट (महिला व पुरुष) यांच्या स्पर्धा 9 ते 11 मे रोजी घेण्यात येतील.