एकलव्य क्रीडा संकुलातील जलतरणपटूंचे वर्चस्व

0
20

जळगाव : प्रतिनिधी

स्व.पी. व्ही. माळीदादा फाउंडेशन जळगांवतर्फे पोलीस जलतरण तलावावर स्व. पी.व्ही. माळीदादा जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलातील विद्यार्थी हे अंडर १०, अंडर १४, अंडर १७ व खुल्या गटात सहभाग नोंदवून अनुक्रमे १५ सुवर्ण पदक, ४ रजत पदक व १ कांस्य पदक पटकावले.

यामध्ये पुरुष गटात जलतरणपटू शुभम युवराज काळे यांनी खुल्या गटात १०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर बॅकस्ट्रोक व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, जलतरणपटू कार्तिक लीलाधर काकडे यांनी अंडर १७ गटात १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये सुवर्ण तर १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारामध्ये रजत पदक पटकावले, जलतरणपटू कार्तिक सुनील पाटील यांनी अंडर १४ गटात १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारामध्ये कांस्य तर १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले, जलतरणपटू नमन अजय शिरसाठ यांनी १०० मीटर फ्री स्टाईल रिले मध्ये स्वर्ण पदक पटकावले, जलतरणपटू महावीरसिंग सत्यजीतसिंग पाटील यांनी ५० मीटर फ्री स्टाईल व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये सुवर्ण तर ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये रजतपदक पटकावले व जलतरणपटू अथर्व अमोल पाटील ५० मीटर फ्री स्टाईल व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये रजत तर ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले

महिला गटात जलतरणपटू निधी सत्यजितसिंग पाटील हिने अंडर १४ गटात १०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर बॅकस्ट्रोक व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, तसेच जलतरणपटू फाल्गुनी रवींद्र सपकाळे हिने अंडर १० गटात ५० मीटर फ्री स्टाईल, ५० मीटर बॅकस्ट्रोक व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले
या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, के.सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे, के.सी.ई. सोसायटीचे संचालक श्री. डी.टी. पाटील जलतरण प्रशिक्षक श्री. अखिलेश यादव, भूषण तायडे, कु. कोमल पाटील यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here