एकनाथ शिंदे गटाकडे मॅजिक फिगर ; आणखी आमदार गोटात दाखल

0
6

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय खळबळ माजली आहे. खुर्ची आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील असले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही पक्षातील आणखी काही आमदार बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचले आहे. त्याचवेळी या सात बंडखोरांसह 2 अपक्ष आमदारही गुवाहाटीमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे.

गुवाहाटीत रेडिसन हॉटेलमध्ये शिवसेने बंडखोर एकनाथ शिंदे आणि समर्थकांची खलबते सुरुच आहेत. शिंदेंच्या गटात शिवसेनेचे 38 आमदार, 7 अपक्ष आमदार असे एकूण 45 आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाकडे दोन तृतीयांश संख्याबळाचा आकडा पोहोचला आहे. कालपासून 8 आमदार शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत.

गुवाहाटीला पोहोचल्यानंतर शिंदे समर्थकांच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटाला 38 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे तर 7 अपक्ष आमदारही शिंदेंच्या गटात सहभागी झालेत. तसेच काही खासदारांचाही पाठिंबा आहे. जवळपास 10 खासदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

गुवाहाटीमध्ये सध्या बंडखोर आमदारांची जोरदार खलबतं सुरु आहेत. त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात प्रताप सरनाईक हे भरत गोगावले यांच्याशी बोलत आहेत, त्यांना पक्षप्रतोदाच्या अधिकारांची माहिती देताना ऐकायला येतंय. आता तुमची जबाबदारी वाढलीय. सगळ्या आमदारांना व्यवस्थित सांभाळा असा सल्लाही त्यांनी दिलंय. इतकच नाही या चर्चेवेळी तर आधीचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर त्यांनी टीकाही केलीय.

शिवसेनेचे आणखी एक आमदार शिंदे गटात सामील होतायत. मुंबईतील कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर हे सूरतमार्गे गुवाहाटीकडे निघाले. त्यांनी स्वतः ही माहिती दिलीये. काल सकाळपर्यंत आपला विचार नव्हता, मात्र आता आपण गुवाहाटीला जातोय असं कुडाळकरांनी सांगितले आहे. एकीकडे राज्यात वेगवान राजकीय घडामोडी होत असताना ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बाजुनं शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है असे बॅनर शहरात अनेक ठिकाणी लागलेत. तर काही शिवसैनिकांनी वुई सपोर्ट एकनाथ शिंदे लिहिलेलं पोस्टर घेऊन रॅलीही काढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here