एकनाथ खडसेंच्या विजयाची गिरीश महाजनांना खात्री ?

0
59

जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आपले लक्ष्य ठरवले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपचे अनेक सत्तास्थाने हातून गेले आहे. भाजपचे (BJP) नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचीदेखील कोंडी झाली. अशातच राष्ट्रवादीने खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत महाजनांची आणखी कोंडी केली आहे. त्यामुळे खडसे यांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी महाजनांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचं ठरलं ; विधान परिषदेत ४ मते काँग्रेसला देणार

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या यादीत त्यांचा नावाचा समावेष केला. मात्र आद्यपही ती यादी प्रलंबित आहे. भाजपने (BJP) खडसे यांच्या मार्गात राजकीय काटे पेरले. त्यामुळे खडसे यांचा विजय झाल्यास सर्वाधीक धक्का भाजपश व गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना बसणार आहे.

आज होणाऱ्या खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या राजकीय उत्कर्षाची पुन्हा आशा निर्माण झाली आहे. त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. तब्बल सहा वर्षांनंतर ते गुलाल उधळणार काय? याचा निकाल आज लागणार आहे. या निकालाने खानदेशचे राजकीय समीकरण बदलणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here