अमळनेर – प्रतिनिधी । आज ऋषीपंचमी निमित्ताने जिल्हाभरातील महिलांनी तालुक्यातील तापी पांझरा आणि गुप्त गंगा या त्रिवेणी संगमावर असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
तालुक्यातील तापी पांझरा तसेच गुप्त गंगा या पवित्र त्रिवेणी संगमावर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे संपूर्ण खान्देशात भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी या तिर्थस्थळावर असंख्य भाविकांची मांदियाळी असते. दरम्यान,तालुक्यातील तापी पांझरा तसेच गुप्त गंगा या पवित्र त्रिवेणी संगमावर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात आज ऋषीपंचमी निमित्ताने जिल्हाभरातून महिला भाविकांनी याठिकाणी त्रिवेणी संगम असल्याने पवित्र स्नान करून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर गाभाऱ्यात असलेल्या स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करीत हजारो महिला भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. कपिलेश्वर मंदिर संस्थांच्या वतीने मंदिर परिसरात वाहनांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मंदिराजवळ तीन नद्यांचा संगम असल्याने तसेच शहादा येथील सुलवाडे बॅरेजच्या बॅक वाटरमुळे येथे मोठ्या प्रमाणात जलाशय तयार झाले आहे. परिणामी वर्षभर येणारे भाविक याठिकाणी नौका विराहाचा आनंद घेत असतात.