उभ्या कंटेनरला दुचाकीची धडक ; तरुण जागीच ठार

0
78

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पाळधी येथील कॉलेज तरुणाचा आज सकाळी पहूर येथील खर्चाने फाट्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनर ला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज आठ वाजता घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की पहुर पाळधी येथील रहिवाशी समाधान देव सिंग परदेशी वय 23 हा कॉलेज तरुण सकाळी सोयगाव येथे परीक्षा असल्यामुळे तो पेपर देण्यासाठी मोटरसायकल क्रमांकm h 19 b s 0235 या मोटरसायकली ने जात असताना जळगाव संभाजीनगर महामार्गावर पहूर जवळ खर्चाने फाटा दरम्यान पंचर झालेल्या उभी असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याच्या हातापायाला डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे समाधान परदेशी याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली असून या अपघाताची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांना कळताच आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन मयत समाधान परदेशी याला ताबडतोब पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता या डॉक्टर अजय राठोड यांनी मृत्यू झाल्याची सांगितले. समाधान परदेशी पहुर ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करून आज दुपारी दोन वाजता पाळधी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here