उन्नती मंडळ व मल्हार सेना तर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती उत्सव साजरी

0
27
चाळीसगाव प्रतिनिधी
धनगर समाज उन्नती मंडळ व मल्हार सेना चाळीसगाव यांच्या विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी  होळकर यांची 297 वी जयंती उत्सव मंगळवार दिनांक ३१/५/२०२२ रोजी सकाळी ९ वाजता समाजाचे ज्येष्ठ नागरिक व पत्रकार श्री रमेश  जानराव  व सौ रजनी जानराव यांच्या हस्ते सपत्नीक पुतळा पूजन करण्यात आले . सकाळी ९ वाजता पूजनानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोटर सायकल रॅली काढण्यात आली रॅलीला समाजाचे अध्यक्ष साहेबराव आगोने यांनी पिवळा झेंडा दावून प्रारंभ करण्यात आले यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते . सायंकाळी ५ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे. मिरवणूक सदर बाजार ,आंबेडकर चौक, घाट नागद चौफुली मार्गे अहिल्यादेवी चौकात समाप्त करण्यात येईल. या कार्यक्रमांसाठी जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी नागरिकांनी वरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज उन्नती मंडळ व उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here