उद्धव ठाकरेंच्या सोबतीला शरद पवारही मैदानात

0
81

 

मुंबई : प्रतिनिधी 

महाविकास आघाडीच्या विरोधात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंड पुकारले आहे. शिंदे यांनी आपल्याकडे ४० ते ५० आमदार असल्याचा दावा केल्याने ठाकरे सरकारमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना इतक्या आमदारांचे समर्थन कसं मिळाले? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. मुख्यमंत्र्यांना या संकटातून काढण्यासाठी तसेच सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड हातळण्यासाठी पवार ठाकरेंसोबत रणनीती आखात आहे. गेल्या एक तासांपासून पवारांची संजय राऊत अनिल देसाईसोबत  बैठक सुरु आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेसोबत झालेल्या बैठकीनंतर पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकार विधान भवनात बहुमतात असेल, असा विश्वास व्यक्त केला. सरकार टिकविण्यासाठी आपण सर्व स्तरावर प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. जे आमदार शिंदेसोबत आहे ते मुंबईत आल्यावर स्पष्ट करतील की ते नेमके कोणासोबत आहेत, अशी भूमिका पवारांनी मांडली.

दरम्यान २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र पवारांना हा बंडही फोडून काढण्यात यश आले. त्यामुळे शिंदे गटाचा बंड शमविण्यात पवार यशस्वी होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here