Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»ईडीचा पुन्हा आ. प्रताप सरनाईक यांना दणका ; ११.३५ कोटींची संपत्ती जप्त
    मुंबई

    ईडीचा पुन्हा आ. प्रताप सरनाईक यांना दणका ; ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

    SaimatBy SaimatMarch 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुबई : प्रतिनिधी
    शिवसेना नेते प्रताप सरनाईक पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनलायाच्या (ED) रडारवर आले आहेत. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ईडीने प्रताप सरनाईकांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
    मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने NSEL प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, 25 डिफॉल्टर आणि इतरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केलं, बनावट कागदपत्रं तयार केली, खोटी खाती तायर केली आणि त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. १३ हजार गुंतवणूकदरांची ५६०० कोटींची फसवणूक केल्याची माहिती ईडीने दिली आहे.
    PMLA अंतर्गत करण्यात आलेल्या तपासात आढळून आलं आहे की, वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे NSEL च्या कर्जदार/ट्रेडिंग सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकित कर्जाची परतफेड आणि इतर गोष्टींसाठी वळवले होते. ईडीने केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची २४२.६६ कोटींची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन २०१२-१३ कालावधीत विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टकडे २१.७४ कोटी वळते केले. त्यापैकी ११.३५ कोटी विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली. ईडीने पैशांच्या या साखळीचा तपास केल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्या नावे असणारे दोन फ्लॅट आणि जमिनीचा भाग जप्त केला आहे. याची एकूण किंमत ११.३५ कोटी आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.