जळगांव: येथील ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात द्वितीय वर्ष बी.एड. च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, नविन विद्यार्थ्यासाठी स्वागत समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बक्षिस वितरण तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व्ही. टी. पठाण आणि प्रा. सौ. फरीदा लहेरी यांच्या निवृत्ती निमित्तने निरोप समारंभ अशा बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अब्दुल करीम सालार होते. या कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ. ईकबाल शाह, सचिव एजाज मलिक, सहसचिव डॉ. ताहेर शेख, संस्थेचे सदस्य मा. अ. रशीद शेख, मा. जफर शेख, मा. अब्दुल अजिज सालार तसेच ईकरा नगर कॅम्पस मधील विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
बी.एड. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी महाविद्यालयात विविध क्रिडा स्पर्धा, मराठी राजभाषा दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन, पोस्टर प्रेझेंटेशन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मागच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे चेअरमन मा. अ. रऊफ शेख यांच्या तर्फे अ. रशीद ट्राफी देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यपक व्ही. टी. पठाण व आणि प्रा. फरीदा लहेरी यांचा निरोप समारंभ निमित्ताने संस्थेच्या सर्व पदधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातर्फे व विद्यार्थ्यांतर्फे त्यांना गिफ्ट देण्यात आले. आपल्या निरोप सभारंभ निमित्ताने प्रा. व्ही. टी. पठाण आणि प्रा. फरीदा लहेरी मॅडम यांनी ईकरा परिवाराशी संबंधित आपल्या काही आठवणीचे कथन केले. संस्थेच्या पदाधिकारी यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. इरफान शेख यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय आणि सत्कार कार्यक्रमाचे संचालन प्रा. वसीम शेख यांनी केले. प्रा. अजीम शेख यांनी बक्षिस वाटप कार्यक्रमाचे संचालन केले. आभार प्रदर्शन डॉ. इश्वर सोनगरे यांनी केले. सपुर्ण कार्यक्रमाचे सुत्र-संचालन प्रथम वर्ष बी एड चे विद्यार्थी तन्वीर रजा यांनी केले.