जळगाव : प्रतिनिधी
येथील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे रविवारी २७ फेब्रुवारी रोजी घरगुती महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘इनरव्हील मेळा’चे आयोजन करण्यात आले होते. मेळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी एका गरजू मुलीला सायकल तर एका शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेळ्याचे उदघाटन इनरव्हील क्लबच्या जिल्हा चेअरमन अश्वनी गुजराती, सहायक विश्वस्त मीनल लाठी, उद्योजिका कल्पना भालचंद्र पाटील, शिल्पा चोरडिया, डॉ. अनुराधा वानखडे राऊत यांच्या उपस्थितीत झाले.
सुरुवातीला केतकी पाटील हिने गणेश वंदना सादर केली. प्रस्तावनामधून इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा नीता परमार यांनी मेळ्याच्या आयोजनाबाबतचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून तसेच फीत कापून मेळ्याचे उद्घाटन केले.
प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनण्यासाठी ‘इनरविल मेळा’ एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो असे अश्विनी गुजराती यांनी सांगितले. प्रसंगी एका गरजू विद्यार्थिनीला सायकल वाटप करण्यात आली. तसेच मातोश्री मीनाताई प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा केकत निंभोरा तालुका जामनेर या शाळेला सामाजिक बांधिलकीतून पाच हजार रुपयांचे क्रीडा साहित्य देण्यात आले आहे.
मेळ्यासाठी उद्योजक राजेश चोरडिया, कल्पना पाटील, मनीष लुंकड, डॉ. धनराज चौधरी आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन माधवी असावा आणि दिशा अग्रवाल यांनी तर आभार कार्तिकी शहा यांनी मानले. मेळ्यासाठी अध्यक्षा नीता परमार, सचिव बबिता मंधान, खजिनदार दीपा टीबरेवाल आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
मेळाव्यात जिल्ह्यात अनेक महिला या घरी उत्पादन तयार करून विकत असतात. तसेच घरीच वस्तू आणून विकत असतात. अशा छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने या मेळाचे आयोजन काव्यरत्नावली चौकात करण्यात आले होते. एकूण ७० व्यावसायिकांनी मेळ्यात सहभाग घेतला.
मेळ्यात सौंदर्य प्रसाधने, पादत्राणे, खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती वस्तूंची उत्पादने, खेळणी आदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लागणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यात आली.
मेळ्याच्या ठिकाणी कोरडा प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. या कचऱ्याचे रिसायकलिंग करण्यात येईल. तसेच, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात तीन फॅशन डिझायनरच्या ड्रेसचे मॉडेलांनी रॅम्प वॉक केले.
Home Uncategorized इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टचे तर्फे “इनरव्हील मेळा”तून घरगुती महिलांना मिळाले व्यासपीठ