जळगाव ः प्रतिनिधी
मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांचे 24 मे 21 रोजी अकस्मात मृत्यू झाले होते त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त 25 में 22 रोजी इदगाह कब्रस्तान ट्रस्टतर्फे इदगाह मैदानाच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून एक सुंदरशी अत्याधुनिक अशी सार्वजनिक पाणपोई तयार करण्यात येत असून त्या पाणपोईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
गफ्फार मलिक यांना आपल्या नातवंडावर फार प्रेम होते व त्याचे प्रतीक म्हणून ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी सदर पाणपोईच्या कामाची सुरुवात लहान-लहान नातवंडे कुमार मोइज,उमर सईद व हम्माज मालिक यांच्या हस्ते कुदळी मारून करण्यात आली.
ही पाणपोई अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त तयार करण्यात येत असून त्या पाणपोईचा वापर सर्वसामान्यांसाठी खुला राहणार असल्याने ही पाणपोईगफ्फार मलिक यांचे बंधू व त्यांची मुले स्वखर्चाने बांधून देत आहे.कार्यक्रमाच्या सुरुवातीस गफ्फार मालिक यांना श्रध्दांजली वाहून मौलाना शेख यांनी मग़फ़ेरतची दुआ केली.
6 स्वीकृत सदस्याची नियुक्ती
कार्यकारी मंडळाच्या सभेत अध्यक्ष वहाब मालिक यांनी ट्रस्ट च्या उरलेल्या कालावधीसाठी 6 स्वीकृत सदस्यांची नावे सादर केली असता त्यास सर्व सम्मतिने मान्यता देण्यात आली ती नावे मानद सचिव फारूक शेख यांनी घोषित केली. त्यात अब्दुल अजीज सालार,कादर कच्ची,रईस पटेल, मुश्ताक बादलीवाला, शरीफ बाबा पिंजारी व रेहान शेख यांचा समावेश आहे.नवनियुक्त सदस्यांचा ट्रस्ट तर्फे वहाब मालिक यांनी बुके देऊन सत्कार करण्यात आला.या दोन्ही कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी केले तर आभार मलिक परिवारातर्फे नदीम मलिक यांनी मानले.
या कार्यक्रमात मलिक परिवारा तर्फे एजाज मालिक,रहीम मालिक,नदीम मालिक,हारिश,शारिक,हर्षद,फ़ाज़,मन्नान मालिक सह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मालिक, सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष मुस्ताक अली व रियाज़ मिर्ज़ा, खजिनदार अशपाक बागवान, सहसचिव मुकीम शेख व अनिस शाह, संचालक ताहेर शेख, नाजिर मुल्तानी,सादिक सय्यद, मजहर खान, अय्यूब खाटीकसह पिंजारी बिरादरी,मेमन बिरादरी व पटेल बिरादरी तसेच इतर व्यक्तींची उपस्थिती होती.



